VIDEO : गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठीच्या तयारीला सुरुवात - गुढीपाडवा 2022
पुणे : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या आणि पहिला सण म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो. गुढीपाडव्याला साखर गाठींचे विशेष महत्त्व असते. पुण्यातील गणेश ढेंबे यांच्या कारखान्यात गुढीपाडव्याच्या आधीपासून साखरेची गाठ बनवण्यास सुरूवात होते. साखर गाठ वाढत्या महागाईमुळे साखरेचे आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे सुमारे वीस रुपये किलोप्रमाणे वाढलेले आहेत. दगडूशेठ गणपती आणि इतर मंदिरांना 5 किलो वजनाची साखर गाठ बनवली जात आहे. दररोज तीनशे ते चारशे किलो साखर गाठी तयार करण्यात येतात, असे गणेश ढेंबे यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST