Protest For Railway In Gadchiroli : वडसा रेल्वे स्थानकाच्या बाहेर रास्ता रोको; पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील वडसा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ( Communist Party of India ) सोमवारी रास्ता रोको आंदोलन ( Protest For Railway In Gadchiroli ) केले. गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर सर्व प्रवासी गाड्या सुरळीत सुरू करण्याची मागणी केली. वर्दळीच्या या रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने केवळ एकच गाडी सुरू केल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा रेल्वेमार्ग गाड्याच नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची मोठी अडचण - गडचिरोलीच्या वडसा शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज रास्ता रोको आंदोलन केले. गोंदिया- बल्लारपूर या महत्वाच्या रेल्वे मार्गावर सर्व प्रवासी गाड्या सुरळीत सुरू करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. वर्दळीच्या या रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने कोरोनानंतर केवळ एकच गाडी सुरू केल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना महाराष्ट्राशी जोडणारा रेल्वेमार्ग गाड्याच नसल्याने गैरसोयीचा ठरत आहे. वडसा येथे शेकडो भाकप कार्यकर्त्यानी प्रवासी गाड्या सुरू करण्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर बैठक मारली. यात चंद्रपूर- गडचिरोली- गोंदिया या जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले. कोरोना आधीच्या सर्व गाड्या पुन्हा सुरू न झाल्यास पुढच्या काळात रेल रोकोचा इशारा भाकपने दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST