महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nana Patole On Obc Reservation : केंद्र सरकारच्या खासगीकरणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले - नाना पटोले - नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

By

Published : Feb 19, 2022, 1:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

रत्नागिरी - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागातर्फे राज्यात ओबीसींच्या हक्क अधिकार व न्यायासाठी 'हल्लाबोल रॅली' काढली जाणार आहेत. त्याची सुरुवात रत्नागिरीतून झाली आहे, तर शेवट 15 मार्चला अकोल्यात होणार आहे. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय, सामाजिक आरक्षण कमी करायचे धोरण सुरू केले आहे. सरकारच्या खासगीकरणामुळे सगळ्यात मोठा धोका आरक्षणाला निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक उपक्रम विकायला सुरुवात केली आहे. कोकण रेल्वे देखील विकायला काढली आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details