Disha Salian Case : मालवणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत राणे पितापुत्रांची चौकशी; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी - नारायण राणे लेटेस्ट न्यूज
मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला ( Disha Salian Case ) आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी राणे पिता-पुत्र मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. तसेच याप्रकरणाचे पुरावे सीबीआयला देऊ, अशी माहिती राणे यांचे वकील सतिष मानेशिंदे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST