महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mula-Mutha River Improvement Project : मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी 'जायका'कडून निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब - महापौर मुरलीधर मोहोळ - pune mayor on mula mutha river news

By

Published : Feb 21, 2022, 8:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

पुणे - शहरातील मुळा-मुठा या दोन्ही नद्यांच्या संवर्धनासाठी जायका'कडून निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाले आहे. ( Muralidhar Mohol on Mula Mutha River )जायकाच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून साकारत असलेल्या प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेला 'जायका'ने मान्यता दिली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यामुळे प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ( Mula-Mutha River Improvement Project ) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत असलेल्या मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्याच्या कामाच्या (जायका) निविदा प्रक्रियेची अंतिम मान्यता बाकी असल्याने ही प्रक्रिया थांबलेली होती. या प्रकल्पाला मान्यता दिल्याने गेली अनेक वर्षे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा-मुठा नद्या स्वच्छ पाण्याने वाहणार आहेत. या प्रकल्पात शहराच्या मुळा आणि मुठा काठच्या परिसरात एकूण ११ सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या सांडपाणी पूर्णपणे शुद्ध करुन नदीत सोडले जाणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details