नवाब मलिक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे - प्रकाश आंबेडकर - नवाब मलिक ईडीकडून अटक
मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक (Nawab Malik Arrest) केली आहे. मनी लॉन्ड्रिंग तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. त्यानंतर राज्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून कालच स्पष्ट करण्यात आले होते की नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही. मात्र, यावर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नवाब मलिक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजेत असे वक्तव्य केले आहे. तसेच या गुन्हेगारी राजकारणावर काँग्रेस गप्प का? असा प्रश्न देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST