महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

PM Modi in Goa Election Campaign : गोव्यातील जनतेला काँग्रेसमुळे 15 वर्षे स्वातंत्र्य मिळण्यास उशीर - पंतप्रधान नरेंद्र मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा स्वातंत्र्य

By

Published : Feb 10, 2022, 8:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा ( Narendra Modi slammed congress over Goa Freedom ) साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi in Goa Election Campaign ) म्हणाले, की गोवा मुक्तीसंग्रामला उद्धवस्त करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला. काही तासांचे काम मात्र, त्याला 15 वर्षे लागले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्याग्रह करावा लागला. काँग्रेसने गोव्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी मदत केली नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासांठी सैनिक पाठविणार नसल्याचे देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावरून भाषणातून सांगितले होते. ही काँग्रेस तुम्हाला मते मागत आहे, असा टोला पंतप्रधा नरेंद्र मोदींनी ( PM Modi in Goa Election Campaign ) काँग्रेसला लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details