Horse Cart in Amaravati : अमरावतीत पेट्रोल पंपावर घोडागाडी - Horse Cart in Amaravati
अमरावती : देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे .पेट्रोल 120 रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे. तर डिझेलने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पुरते कोलमडले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक रस्त्यावर उतरत आहे अशातच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती मधील एक व्यक्तीने गुरुवारी रात्री चक्क घोडागाडी घेऊनच पेट्रोल-डिझेलच्या किमती विचारायला इर्विन चौक येथील पेट्रोल पंपावर पोचला. पेट्रोलपंपावर पोचलेल्या घोडागाडीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST