Varun Sardesai शंभर दिवस जेलमध्ये असूनही राऊतांनी निष्ठा सोडली नाही - वरुण सरदेसाई - युवासेना सचिव वरुण सरदेसाई
कोल्हापूर शंभर दिवसांपासुन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आज कोल्हापुरात शिवसैनिकांनी साखर पेढे वाटप जल्लोष केला. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शंभर दिवसापासून संजय राऊत हे कोठडीत होते तरीही त्यांनी पक्षाबद्दल प्रेम आणि निष्ठा सोडली नाही, ते शिवसेनेचे खरे शिवसैनिक आहेत, असे म्हटले आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST