महाराष्ट्र

maharashtra

युवक काँग्रेस आक्रमण

ETV Bharat / videos

Youth Congress Protest: संभाजी भिडेंविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; अटकेची मागणी - संभाजी भिडे

By

Published : Jul 31, 2023, 5:03 PM IST

पुणे : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. देशभरात भिडे यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. पुण्यात देखील काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही करण्यात आली. यावेळी विश्वजित कदम म्हणाले की, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने संभाजी भिडेंविरोधात कडक कारवाई करावी तसेच ताबडतोब त्यांना अटक केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ते गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. मात्र, आम्ही ते कधीच सहन करणार नाही. ज्यांनी देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे, अशा महापुरुषांच्या बाबतीत अशी वक्तव्ये जर केली जात असतील तर ते निंदनीय आहे आणि आम्ही याचा निषेध करतो, असे यावेळी विश्वजित कदम म्हणाले. यावेळी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

ABOUT THE AUTHOR

...view details