Youth Congress Demand चंद्रकांत दादांनी भीक मागून शाळा बांधावी, युवक काँग्रेसची मागणी - Youth Congress Demand
Youth Congress Demand शाहू, फुले आंबेडकर हे आखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण राजकारण असो समाजकारण असो करत आहे. आज जे काही राज्यातील वैभव आहे, ते त्यांच्या कर्तृत्वाने आहे. लोकप्रतिनिधी सतत त्यांच्या विचारांना तडा लावून त्यांचा अवमान करत आहेत. अश्या या लोकप्रतिनिधींचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर दादांनी भीक मागून शाळा बांधावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. सध्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे. उच्च शिक्षण मंत्री असलेले भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य केलं आहे. फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांच्या विचार धारेवर चालणाऱ्या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींनी असे महापुरुषांबद्दल वक्तव्य करणे हे खूप निंदनीय आहे. हे त्यांना न शोभणारे आहे, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST