International Yoga Day 2023 : नांदगावमधील अवलियाने चक्क झाडावरच केले योग प्रात्यक्षिक, पाहून थांबेल तुमचा श्वास - नांदगावच्या व्यक्तीचे झाडावर योग प्रात्यक्षिक
नाशिक : संपूर्ण जगात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे. यासाठी अनेक शाळेत कॉलेज यासह अनेक संस्थामध्ये योगसन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांनी योग साधनेकडे वळावे, यासाठी योग शिक्षक अनेक नानाविध उपाय करत असतात असाच एक अवलिया आहे. बाळासाहेब मोकळ हे गेल्या 20 वर्षांपासून योग साधना करत आहेत. योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नागरिकांनी योगसाधना करावी. नागरिकांमध्ये त्याची जनजागृती व्हावी यासाठी मोकळं धडपड करत असतात. आज साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमिताने त्यांनी काल सांयकाळी झाडावर व मोटारसायकलवर योग प्राणायाम आसने करून दाखवली. याआधी त्यांना योग साधनांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी आपण नवनवीन प्रयोग करत असतो असे मोकळे यांनी सांगितले.