महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आदिवासी नृत्य करून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विजयी जल्लोष - MLA Ashok Uike

By

Published : Jul 24, 2022, 1:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

यवतमाळ - आदिवासी नृत्य ( Tribal dance ) करून भाजपा ( BJP ) अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) विजयी झाल्याचा जल्लोष करण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपती पदावर एनडीएच्या ( NDA )द्रौपदी मुर्मू यांची निवड होताच यवतमाळमध्ये ( Yavatmal ) भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अशोक उईके ( MLA Ashok Uike ) यांच्या नेतृत्वात विविध आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा जयजयकार करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या चांगल्या कार्यकाळासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर आहे. 'सबका साथ सबका विकास' या त्यांच्या धोरणातूनच देशाच्या इतिहासात प्रथमच एका आदिवासी समाजाच्या महिलेला भारताच्या राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली, असल्याचे सांगत आमदार अशोक उईके यांनी हा देशभरातील आदिवासी समाजाचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details