World Record: वर्ल्ड रेकॉर्ड सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीतून साकारली साईंची प्रतिमा, पाहा खास व्हिडिओ
World Record: शिर्डी कमीत कमी वेळात साईंची सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी बनवून जागतिक विक्रम अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मसुदा दारूवाला यांनी आपल्या नावे केला आहे. मसुदाच्या या सर्वात लहान रांगोळीची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याचप्रमाणे सर्वात कमी वेळात लहान रांगोळीतून साईंची प्रतिमा बनवल्याबद्दल त्यांना एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड, किंग्ज बुक ऑफ रेकॉर्डचे पुरस्कारही मिळाले आहे. 43 वर्षीय मसूदा या शिर्डी येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. मसूदा दारूवाला यांनी पोर्ट्रेट रांगोळीमध्ये 40 मिनिटांत 2 सेमी बाय 2.5 सेमी जागेत साईंची प्रतिमा तयार केली आहे. यापूर्वीचा 5 सेमीचा जागतिक विक्रम मोडून मसूदाने सर्वात कमी जागेत पोर्ट्रेट रांगोळी काढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. कोपरगावसारख्या ग्रामीण भागातून एवढ्या कमी जागेत रांगोळीत साईंची प्रतिमा साकारून मसूदा यांनी विश्वविक्रम केल्याने यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST