क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी ऑफर; एकावर एक मिसळ फ्री - विश्वचषक सामना
Published : Nov 19, 2023, 2:52 PM IST
|Updated : Nov 19, 2023, 3:00 PM IST
पुणे World Cup 2023 : भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया सोबत खेळत आहे. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्साहात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकानं अनोखी ऑफर ठेवली आहे. अंतिम सामन्याचा दिवस असल्यानं या हॉटेलमध्ये एका मिसळवर एक मिसळ फ्री ठेवण्यात आली. त्याचा क्रिकेटप्रेमी आस्वाद घेत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या पाटील मिसळ इथं क्रिकेट प्रेमींसाठी खास सवलत देण्यात आली आहे. आज विश्वचषक सामना बघण्यासाठी आणि आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी एका मिसळवर एक मिसळ मोफत देण्याची ऑफर ठेण्यात आली आहे. आज होणारा सामना भारत नक्की जिंकेल अशीच भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली आहे.