MP Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंनी सायकल चालवून दिला 'नो व्हेहिकल डे'चा संदेश - MP Supriya Sule riding bicycle in Pune
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या विविध समाोपयोगी महिमेत नेहेमीच पुढे असतात. आज टीम बावधन सिटिझन फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'नो व्हेहिकल डे' या मोहिमेत सायकल चालवून त्यांनी अनोखा संदेश दिला आहे. टीम बावधन सिटिझन फोरमच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी या मोहिमेअंतर्गत सायकल चालवत 'नो व्हेहिकल डे' साजरा केला जातो. आज खासदार सुप्रिया यांनी या मोहिमेत सहभाग घेत आज 'नो व्हेहीकल डे' चा संदेश दिला आहे. सायकल चालविणे हे शारिरीक स्वास्थासाठी अतिशय फायदेशीर असते. 3 मार्च हा जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. सायकल चालविल्याने प्रदूषण होत नाही, त्यामुळे पर्यावरण संतुलन राहते.