Water scarcity in Nashik: जीवावर उधार होत महिलांची पाण्यासाठी धडपड, पाहा व्हिडिओ
नाशिक :ऊन तापलय. सगळीकडे ऊन्हाच्या कडक झळाया दिसतायेत. घराबाहेर पडल तर अंगाची राख होते की काय अशी स्थिती आहे. त्यात अनके ठिकाणी पाण्याने तळ गाठलाय. लोकांना अक्षरश: पाण्यासाठी वणवण फिराव लागत आहे. आणि हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.पाण्याची टंचाई वाढू लागल्याने, महाराष्ट्रातील नाशिकमधील पेठमधील एका गावातील महिला मोठ्या कडक ऊन्हात पाणी आणण्यासाठी एका मोठ्या धोकादायक विहिरीत उतरल्या आहेत. हे चित्र पाहील्यावर लक्षात येतय पाण्याची काय अवस्था झाली आहे. दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेत राज्यातील अनेक गावांमध्ये जल जीवन अभियानांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, पाणी टंचाई असलेल्या गावांना जवळच्या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असे राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.