Rashmi Thackeray Birthday महिला कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर साजरा केला रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस - उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे
Rashmi Thackeray Birthday मुंबई दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस Rashmi Thackeray Birthday असल्याने शिवसैनिकांसाठी हा डबल धमाका मानला जात आहे. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मातोश्रीवर दाखल झाले होते. मातोश्री बाहेर जमलेल्या या कार्यकर्त्यांनी फटाके, गुलाल उडवत घोषणा दिल्या आहेत. या कार्यकर्त्यांना भेटायला स्वतः उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे बाहेर आल्या आणि या कार्यकर्त्यांच्या आभार मानले आहे. मात्र, रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देणे थांबवत 'बार बार ये दिन आये' हे वाढदिवसाच गाणं म्हणायला सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या अनोख्या शुभेच्छांमुळे रश्मी ठाकरे देखील भारवलेल्या दिसून आल्या होत्या. त्यांनी या सर्व महिला कार्यकर्त्यांचे आभार मानले. सुरुवातीला या महिला कार्यकर्त्या 'पन्नास खोके एकदम ओके' अशा घोषणा देत होत्या. मात्र, रश्मी ठाकरे बाहेर येताच त्यांनी आपल्या घोषणा थांबवत वाढदिवसाच्या गाणं म्हणायला सुरुवात केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST