Teacher Beaten To Minor Boy क्षुल्लक कारणावरून शिक्षिकेची अल्पवयीन मुलास मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद - बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - खेळताना झालेल्या मुलांच्या भांडणातून शबनम अमीन सय्यद या शिक्षिकेने अल्पवयीन मुलास बेदम( Woman Teacher Beaten To Minor Boy In Wadala ) मारहाण केली. वडाळ्यातील भक्तीपार्क येथील ही मारहाण ( Teacher Beaten To Minor Boy At Wadala ) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीची गंभीर दखल राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाने ( Commission for Protection of Child Rights ) घेतली असून पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागितला आहे. या शिक्षिकेवर कारवाईची माहिती बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा यांनी दिली. मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरुन दिल्यानंतर पोलिसांनी शिक्षिकेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अरगडे यांनी दिली. मारहाणीचा हा प्रकार गंभीर आहे. वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे ( DCP Pravin Munde ) यांनी दिली. ही महिला वडाळा येथील आयएसडब्लू शाळेची शिक्षिका आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST