Train Passes Over Woman Video : अंगावरून रेल्वेची मालगाडी जावूनही वाचली महिला, पहा थरारक व्हिडिओ - व्हायरल व्हिडिओ
Published : Aug 29, 2023, 7:28 AM IST
बंगळुरु :कर्नाटकच्याबंगळुरुमधून एक चित्तथरारक व्हिडिओ समोर आलाय.येथेएक महिला रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना ट्रॅकवर अचानक मालगाडी येऊ लागली. हे पाहून आजूबाजूला उपस्थित लोकांनी एकच आरडाओरड चालू केला. त्यांनी त्या महिलेला रेल्वे ट्रॅकवरच पडून राहण्याची सूचना केली. त्यानंतर महिला ट्र्रॅकवर निपचित पडली. संपूर्ण मालगाडी ट्रॅकवरून जात असताना ती रेल्वेखाली निपचित पडून राहिली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही घटना नुकतेच यलाहंका तालुक्यात राजनुकुंटे रेल्वे स्थानकाजवळ घडली. राजनुकुंटे रेल्वेस्थानक हे नेहमीच अत्यंत व्यस्त असते. या स्थानकावर दररोज शेकडो गाड्या येतात. येथे लोकांना चालत जायचे असल्यास रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.