Video : मंदिरात दिवा लावताना साडीला लागली आग; महिलेचा होरपळून मृत्यू - महिलेचा जळून मृत्यू
पलामू (झारखंड) - मंदिरात पूजा करताना एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विभागीय मुख्यालय असलेल्या मेदिनीनगर येथील कुंड मोहल्ला येथील शिव मंदिरात एक महिला पूजा करण्यासाठी गेली होती. दिवा लावत असताना महिलेच्या कपड्यांना आग लागली. ही महिला स्वत:ला वाचवत मंदिरातून बाहेर आली आणि नंतर मंदिराच्या आत धावली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत भाजलेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST