चारधाम यात्रेला 27 डिसेंबरपासून सुरुवात, पाहा यात्रेचं खास ड्रोन व्हिज्युअल - हिवाळी चारधाम यात्रा
Published : Dec 28, 2023, 9:03 PM IST
डेहराडून (उत्तराखंड) :उत्तराखंडमध्ये 27 डिसेंबरपासून चारधाम यात्रा सुरू झाली आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या आवाहनावरून उत्तराखंडमध्ये हिवाळी चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी हरिद्वार येथून हिवाळी चारधाम यात्रेला सुरुवात केलीय. हिवाळी चारधाम यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हरिद्वारमधील चंडीघाट येथे चारधाम यात्रेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी हिवाळी चारधाम यात्रेला निघालेला जथ्था खरसाळी येथे पोहोचलाय. यावेळी यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं.
संस्कृती पुढं नेली पाहिजे : यानंतर खरसाळी मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर शंकराचार्यांनी यमुनेची आरती, पूजा केली. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामानंतर आज सकाळी शंकराचार्यांनी सोमेश्वर महाराज, राजराजेश्वरी देवीचे दर्शन घेतलं. यावेळी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, सनातन धर्माचं प्रतिनिधित्व जगभर पोहचलं पाहिजे. सनातन धर्मानुसारच पुढं जायला हवं. ऋषी, मुनी, संतांनीच तीर्थक्षेत्र पुढं नेली आहेत. शंकराचार्य, ऋषीमुनींनी सुरू केलेली संस्कृती पुढं नेली पाहिजे.