Much Rain : का पडतोय एवढा पाऊस, पहा काय म्हणाले हवामान तज्ञ
Pune Rain पुणे परतीच्या पावसाला सुरवात झाल्यापासून पुणेसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. Pune Rain गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुणे शहरात पाऊस होत असून दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रीच्या वेळेस पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात Heavy rain झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. काल रात्री ९ नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या संततधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात काल झालेलं पाऊस हा या महिन्यातील सर्वाधिक पाऊस होता. येत्या 2 ते 3 शहरात अश्याच पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तविण्यात आलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST