वालधुनी नदीपात्रात पांढराशुभ्र फेस; रासायनिक सांडपाणी नदीत सोडल्याने घडला प्रकार - वालधुनी नदीपात्रात पांढराशुभ्र फेस
ठाणे : मलंग गडाच्या पायथाशी उगम असलेल्या ( White Foam in Valdhuni River Basin ) जिल्ह्यातील वालधुनी नदीवर अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराजवळ नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने नदी पात्रातील पाण्यावर प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचे चित्र आज दिवसभर पाहायला मिळाले आहे. खळबळजनक बाब म्हणजे अंबरनाथ शहरातील औद्योगिक वसाहतीमधील काही रासायनिक कारखान्यांमधून या नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जात असून, त्यामुळेच या नदीत हे रासायनिक प्रदूषण होत असल्याचे वालधुनी नदी बचाव आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरे असलेल्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तालुक्यातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अनेक वर्षांपासून रासायनिक कारखान्यांकडून सांडपाणी सोडले जाते. या सांडपाण्यामुळे वालधुनी नदीचा रासायनिक नाला झाला असून, याचा नदीकाठच्या नागरिकांना मोठा त्रास होतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST