Sanjay Raut Action Video : संजय राऊतांचे शक्तिप्रदर्शन; ईडी कार्यालयात पोहचताच गेले टेरेसवर; पाहा व्हिडिओ - Sanjay Raut Ed inquiry
मुंबई - शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आज रविवार (दि. 31 जुलै)रोजी ईडीने सुमारे ९ तासाच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. दरम्यान, राऊत यांनी निवडणुकीतील विजयी मिरवणुकीपेक्षा काही कमी शक्तीप्रदर्शन केले नाही. गेटमधून बाहेर पडताना गाडीतून लोकांना अभिवादन केले, पुढे रस्त्याला गाडी आल्यावर गळ्यातला गमजा काढून फिरवला अन् ईडी कार्यालयात पोहचल्यावर राऊत चक्क ईडी कार्यालयाच्या टेरेसवर पोहचले. तिथून त्यांनी पुन्हा अभिवादन केले. राऊत यांच्या या ईडी कार्यालयापर्यंतच्या प्रवासाची चर्चा आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST