महाराष्ट्र

maharashtra

Rahul gandhi on muslim attack

ETV Bharat / videos

Rahul Gandhi On Muslim Attack : 80 च्या दशकात जे दलितांचे झाले तेच आज मुस्लिमांचे होत आहे - राहुल गांधी - राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा

By

Published : May 31, 2023, 8:11 PM IST

हैदराबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी देशात केलेल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत देशाच्या राजकारणावर भाष्य करत भाजपसह  आरएसएसवर हल्लाबोल केला. याचबरोबर त्यांनी भारतातील इस्लामोफोबियाविषयी आपले मत मांडले. मंगळवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधतना राहुल गांधींनी इस्लामोफोबियावर भाष्य केले. एका नागरिकांने राहुल गांधींना इस्लामोफोबिया रिटचे निराकरण करण्यासाठी त्याची काय योजना आहे, विषयी प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, आज जे मुस्लिम जनमुदायाला वाटते तेच 1980 मध्ये उत्तर प्रदेशमधील दलितांना वाटतं होते. तेच शिख लोकांना वाटत होते. भारतात हे अधूनमधून घडत असते. आज भारतातील मुस्लिम समाजाविषयी घडत आहे, ते 1980 मध्ये दलित समाजाबाबत घडते. जर आपण युपीमध्ये गेलो तर 80 दशकात दलित समाजासोबत तेच घडले जे आज मुस्लिमांसोबत चालू आहे. हे अधूनमधून घडत असल्याने आपल्याला अशा आव्हाना समोरे जावे लागते. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. द्वेषाला प्रेमाने पराभूत करावे लागेल. आम्ही ते करू अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details