Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान! म्हणाले, माझ्या विरुद्ध निवडणूक लढवा - WFI President Brij Bhushan Sharan Singh
गोंडा : खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवा असे आव्हान दिले आहे. ही लक्ष्य करण्यात आले. ते म्हणाले की, 'भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रियांकाची दिशाभूल केली आहे. प्रियांका ही मोठी नेता आहे, त्यामुळे माझ्यासमोर गोंडा, कैसरगंज किंवा कुठूनही निवडणूक लढवा. तसेच, ही लढाई आता पैलवानांच्या हातात नाही. ती राजकीय लोकांच्या हातात केली. असा आरोपही ब्रिजभूषण यांनी केला आहे. याचवेळी प्रियंका गांधी यांना तथ्य माहिती नाही. दिपेंदर हुडा यांनी ही माहिती त्यांना दिली असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, प्रियंका गांधी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असे आव्हानही त्यांनी यावेली दिले आहे. तसेच, जिथे मोदीविरोधी आणि सरकारविरोधी घोषणा दिल्या जात आहेत, तिथे रेल्वेचे खेळाडू का गेले? असा सवालही त्यांनी केला आहे.