Video : पाणी साचल्याने;मुंबईच्या अंधेरी सबवेवरील वाहतूक बंद - bhuyari margaveel vahtuk closed
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Mumbai Rain Update ) अनेक भागात पाणी तुंबले असून त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचवेळी हवामान खात्याने आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच भरती-ओहोटीचा इशाराही देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी सबवे जलमय झाला आहे. मुंबईच्या अंधेरी सबवे (Mumbai Andheri Subway) येथे पाणी साचल्याने भुयारी मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्या आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST