Water Flooded Andheri Subway : मुंबईतील अंधेरीच्या भुयारी मार्गात तुंबले पाणी - Meteorological Department
मुंबई : मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ( Heavy Rain in Mumbai ) काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी ( Water Flooded Andheri Subway ) साचले असून, मुंबईला लागून असलेल्या भिवंडी भागातील हे चित्र आहे. हवामान खात्याने आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईला लागून असलेल्या अंधेरी भुयारी मार्गात पाणी तुंबले. अतिवृष्टी झाल्यास ठिकठिकाणी तुंबणारे पाणी आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या समस्या मुंबईकरांसाठी नित्याच्याच. यंदाच्या पावसाळ्यात या समस्या जास्तच भेडसावतील असे संकेत मिळू लागले आहेत. ११०६ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे, ५५ ठिकाणी पाणी तुंबण्याचा पालिकेनेच व्यक्त केलेला अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन मेट्रो मार्गांची कामे पालिका आणि एमएमआरडीएने हा 'पसारा' जवळपास सर्व मुंबईभर मांडून ठेवलेला असल्याने यावेळचा पावसाळा 'नेमेचि येतो' या धर्तीवर नसेल, अशी भीती आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST