Water Crisis : पाण्यासाठी औंध परिसरातील नागरिक आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे - राज्यतील ( Thirsty Maharashtra ) विविध भागातील नागरिकांसह पुण्यातील उपनगरीय भागातील नागरिकांना पाणीटंचाईला ( Water Crisis ) सामोरे जावे लागत आहे. पुण्यातील औंध परिसरातील नागरिक पाण्याच्या प्रश्नांबाबत आक्रमक झाले असून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांनी आंदोलन केल आहे. तर महिलांनी टँकर अडवत आंदोलन केले आहे. पाण्याच्या टाकीत पाणी असून टँकर माफियांच्या फायद्यासाठी टाकीवरील व्हॉल दाबून गेल्या 2 माहिन्यांहून अधिक काळापासून कमी दाबाने परिसरातील नागरिकांना पाणी दिले जात आहे. टंकर ठेकेदार व अधिकारी यांच्यात आर्थिक लागेबांध असल्याचा आरोप माजी नगरसेवक मधुकर मुसळे यांनी केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून औंध बाणेर परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे, पुढील आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी नगरसेवक मुसळे यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST