Nashik School Wari : 400 विद्यार्थी, शिक्षकांचा वारी सोहळा; शाळेला पंढरपूरची अनुभूती - कोरोना
नाशिक - जय जय रामकृष्ण हरी गजराने नाशिकचे बॉईज टॉऊन स्कूलचे ( Boys Town School ) मैदान दुमदुमून गेले होते. आषाढी एकादशीनिमित्त बॉईज टॉऊन शाळेतील 400 विद्यार्थी, शिक्षकांनी एकत्रित येत भव्य पंढरपूर वारी ( Pandharpur Wari ) सोहळ्याचे आयोजन केले होते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे ( Corona ) खंड पडलेल्या वारीला या वर्षी पुन्हा सुरुवात झाल्याने विध्यार्थ्यांमध्ये आनंदचे वातावरण होते. छोटे वारकरी ( Little Warkari ) हातात टाळ, मृदुंग डोक्यावर टोपी आणि मुखात ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर ( Chanting Dyanoba Mauli Tukaram ) करत पांडुरंगाला आर्त साद घालत होते. यावेळी टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत विठुरायाच्या नावाचा जयघोष करत आषाढी एकादशी ( Ashadi Ekadashi ) साजरी केलीये. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे, रुक्मणीची वेशभूषा करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महिला शिक्षकांनी देखील पारंपरिक वेशभूषा करत फुगडी खेळत विध्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर वारीच मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील उपस्थित सर्वांचे आकर्षण ठरले. यावेळी शाळा परिसरात पंढरपूरचं भक्तीमय वातावरण तयार झालं होतं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST