Bharat Mukti Morcha: आरएसएस मुख्यालयासमोर आंदोलन स्थगित.. वामन मेश्राम यांची पोलिसांनी केली सुटका - अध्यक्ष वामन मेश्राम
नागपूर: भारत मुक्ती मोर्चाचे Bharat Mukti Morcha अध्यक्ष वामन मेश्राम Waman Meshram यांना पोलिसांनी मुक्त केले आहे. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या इंदोरा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय RSS headquarters in nagpur असा भव्य मोर्चा आयोजित केला होता. मात्र, शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे पोलिसांनी त्यांना सकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सुमारे 4 तास भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. शहरात हिंसक घडामोडी होऊ शकतात. त्यामुळे वामन मेश्राम यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST