World Paralysis Day जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने वॉकेथॉन, आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न - stroke day
मुंबई इंडियन ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या १९९०-२०१९ च्या अभ्यासानुसार देशभरात सर्वाधिक मृत्यू हे मेंदूशी निगडित आजारांमुळे होत World Paralysis Day 2022 आहे. पक्षाघाताच्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे आवश्यक असल्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देश्याने जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने २९ ऑक्टोबरला सकाळी ग्लोबल रुग्णालयाच्यावतीने मरीन ड्राईव्हला एअर इंडिया ते एनसीपीएपर्यत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले Walkathon on World Paralysis Day होते. पक्षाघातापासून बचाव करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली असणे गरजेचे आहे. तसेच पक्षाघाताचा झटका आल्यानंतर वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याबाबत प्रचार करण्यासाठी आयोजित केलेल्या या वॉकेथॉनमध्ये स्थानिक गट रुग्णालयाचे कर्मचारी पक्षाघातामधून बरे झालेले रुग्ण आणि रुग्णालयातील डॉ. पंकज अगरवा, डॉ. नितीन डांगे डॉ. शिरीष हस्तक हे तज्ज्ञ डॉक्टर असे सुमारे १०० जण सहभागी झाले occasion of World Paralysis Day होते. पक्षाघाताबाबत अधिक जागरूकता करण्यासाठी डब्बावाला चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. अर्धांगवायू स्ट्रोकमुळे एखाद्या व्यक्तीने आपला हात गमावला तर जीवन किती कठीण होऊ शकते. या माध्यमातून दाखविण्यात आले. हात गमावलेल्यांना डबा उघडण्यापासून इतर नियमित कामे करणे खूप अडचणीचे होऊ शकते. तेव्हा वेळेत उपचार घेतल्यास हे अपंगत्व टाळता येईल. हा संदेश जास्तीत जास्त जणांपर्यत पोहचविण्याचा यामागे उद्देश्य Walkathon on World Paralysis Day in Mumbai आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST