Andheri byelection mumbai : २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू; मोठ्याप्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात - District Election Officer Nidhi Chaudhary
महाराष्ट्र विधानसभेच्या १६६ अंधेरी पूर्व या मुंबई उपनगर andheri byelection mumbai जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान Andheri East Assembly ByElection केंद्रांवर कालपासूनच आवश्यक ती जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर आज पहाटे ६ वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी वर्ग कर्तव्यावर उपस्थित आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलासह Mumbai Police Force विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. आज सकाळी ठीक ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी District Election Officer Nidhi Chaudhary यांनी अंधेरी पूर्व मतदार संघातील सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावे व आपले लोकशाही विषयक पवित्र कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST