Ashadhi Wari 2023 : चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांची गर्दी, भाविकांच्या गर्दीने फुलली विठ्ठू नगरी - आषाढी एकादशी
पंढरपूर: आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो विठ्ठल भक्त पंढरपुरामध्ये दाखल झाले आहेत. पंढरपुरात सगळ्या संतांच्या पालख्या दाखल झालेले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर वैष्णवांचा मेळा जमा झाला असून लाखोच्या संख्येने भाविक चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झालेली आहे. परंतु ज्यांना दर्शनासाठी वेळ आहे, ते प्रत्येकजण चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येत आहेत. चंद्रभागेच्या तिरावर मोठी गर्दी दिसत आहे. दरम्यान चंद्रभागेच्या काठावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना वेळोवेळी सूचना सुद्धा देण्यात येत आहे. भाविक पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी दर्शानाच्या रांगेत जात आहेत. पंढरपूरमध्ये अचानक गर्दी वाढल्या असल्याने जागोजागी पोलीस गर्दीचे नियोजन करत आहेत. ज्ञानोबा तुकारामच्या पालखी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने विठुरायाच्या नावाने चंद्रभागेच्या परिसर दुमदुमला आहे.