महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : मुसळधार पावसाचा वाघोबालासु्द्धा फटका; जनावरांच्या गोठ्यात मांडले ठाण - Tiger came in Chargaon

By

Published : Jul 12, 2022, 1:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

मागील ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा ( The torrential Rains ) फटका वन्यप्राण्यांनाही फटका बसला आहे. या मुसळधार पावसादरम्यान वरोरा तालुक्यातील चारगाव येथे एक वाघ गावात ( Torrential Rain, Tiger came to Chargaon ) आला. या वाघोबाने गोठ्यात आसरा घेतला. गोठ्यात वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे जंगलात जाऊ न शकलेला आणि पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक वाघ शेतशिवाराच्या माध्यमातून गावाकडे आला. इतकेच नव्हे तर तो संजय लाखे यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरला. वाघ दिसताच गावकऱ्यांनी आरडाओरड केली. वाघ चारा ठेवलेल्या ठिकाणी चढून बसलेला आहे. वाघाला गोठ्यात बघून ( Tiger is sitting on the fodder ) अनेकांना धक्का बसला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली आणि वाघाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली. कुठलीही दुर्घटना होऊ नये तसेचत्याला पकडण्यासाठी ताडोबाची टीम येथे तैनात झालेली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details