महाराष्ट्र

maharashtra

दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर

ETV Bharat / videos

Dantewada Naxalite Attack Video: दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर, 10 जवान झाले शहीद - Exclusive video of Naxalite attack in Dantewada

By

Published : Apr 27, 2023, 4:16 PM IST

रायपुर (छत्तीसगड) :छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात 10 DRG जवान शहीद झाले आहेत. या घटनेत एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. काल बुधवार (दि. 27 एप्रिल)रोजी झालेल्या या नक्षलवादी हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्फोटानंतरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये गोळीबार करताना आवाज ऐकू येतो, 'उड गया, पुरा उद गया'. व्हिडिओमध्ये स्फोटानंतर सुमारे 10 फूट खोल खड्डाही दिसत आहे. नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात काँक्रीटचा रस्ता तुटला होता. ज्या ठिकाणी नक्षलवादी हल्ला झाला, त्या ठिकाणी मोठा खड्डा आहे. नक्षलवादी दबा धरून बसले होते. जवानांची गाडी अरणपूर पोलीस स्टेशन परिसरात येताच नक्षलवाद्यांनी ती उडवून दिली. या IED स्फोटात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details