Viral Video : भाजपच्या मोर्चात भाडोत्री लोक, शिवसेनेचा आरोप - व्हिडिओ व्हायरल
औरंगाबाद - सोमवारी (दि. 24 मे) पाण्याच्या मुद्द्यावरून भाजपने काढलेल्या जल आक्रोश मोर्चात भाडोत्री लोक आल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे ( MLA Ambadas Danve ) यांनी केला आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या केलेल्या दाव्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांचा पैशांबाबत झालेले संभाषण असणारा हा व्हिडिओ असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) शहरातून जाताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे हे अद्याप स्पष्ट नसले तरी महिलेच्या हातात हंडा असून मोर्चात सहभागी होत असताना तासाच्या हिशोबाने पैसे मिळणार असल्याच महिलेने व्हिडिओत सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST