महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Vikram Gokhale Health Update विक्रम गोखले यांची प्रकृती अतिशय चिंताजनक, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये - Dinanath Mangeshkar Hospital

By

Published : Nov 24, 2022, 12:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

Vikram Gokhale Health Update ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात Dinanath Mangeshkar Hospital गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काल त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली होती. मात्र त्यांच्या निधनाच्या समाजमाध्यमांवर वृत्तामुळे आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली. राज्य सरकारच्या वतीने देखील करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळेही मोठा संभ्रम निर्माण झाला होता. असे असताना विक्रम गोखले यांच्या कौटुंबिक मित्राने समोर येऊन माहिती दिली आहे. ते म्हणाले की विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि आमची विनंती आहे की, कोणीही अफवा पसरवू नये. असे यावेळी कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी माहिती दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details