महाराष्ट्र

maharashtra

विजयादशमीला देवीला सोन्याची साडी परिधान करण्याची परंपरा

ETV Bharat / videos

Vijayadashami 2023 : सारसबागेजवळ विजयादशमीला देवीला नेसवतात सोन्याची साडी; पाहा व्हिडिओ - १६ किलो सोन्याची साडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 1:09 PM IST

Updated : Oct 24, 2023, 1:43 PM IST

पुणे : पुरातन काळापासून दस-याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार सोन्याची साडी परिधान केलेल्या श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन व्हावं, याकरता आलेल्या लाखो भक्तांना देवीचं दर्शन झालं. पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी नेसवली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी नेसवण्याची परंपरा आहे. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते. दक्षिण भारतातील कारागिरांनी २१ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचं काम सुरू होतं. देवीला एका भक्तानं ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचं हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.

Last Updated : Oct 24, 2023, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details