Vijayadashami 2023 : विजयादशमीनिमित्त गोंदियात प्रथमच 101 फुटाचा रावण; आज सायंकाळी करण्यात येणार दहन - 101 feet Ravan for the first time
Published : Oct 24, 2023, 2:17 PM IST
गोंदिया : आज संपूर्ण देशभरात विजयादशमीच्या दिवशी रावणाचा अंत करून रामाने विजय मिळवलेला होता, त्याचं प्रतिक म्हणून रावण दहन करतात. तेव्हापासून विजयादशमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. तर गोंदिया शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विजयादशमी उत्सवासाठी तयारी करण्यात आली. पहिल्यांदाच विदर्भात 101 फुटाचा रावण तयार करण्यात आला तर सोबतच 51 फुटाचा मेघनाद देखील तयार करण्यात आला आहे. ही आकर्षणाची केंद्र गोंदिया येथील टी बी टोली परिसरामध्ये तयार करण्यात आली आहेत. हा रावण तयार करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील कारागीर बोलावण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नातून हा रावण तयार करण्यात आला आहे. तर रावण दहनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येणार आहे. या आतिषबाजीसाठी जबलपूर येथून फटाके व कारागीर आले आहेत. तर या रावण दहनासाठी गोंदियामधील नागरीक सज्ज झाले असून सायंकाळी या रावणाचे दहन करण्यात येणार आहे.