महाराष्ट्र

maharashtra

ललित पाटील मागे गुजरात कनेक्शन

ETV Bharat / videos

ललित पाटील मागे गुजरात कनेक्शन; विजय वडेट्टीवार यांचा आरोप - lalit patil

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 4:02 PM IST

नागपूरWadettiwars allegation on Lalit Patil : दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून नागपुरात विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलला राज्यकर्त्यांकडून अभय दिलं जात असल्याच्या आरोप करत विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय. ललित पाटीलच्या प्रकरणातील डीनवर कारवाई का झाली नाही. ललित पाटीलच्या कारखान्यावर कारवाई नाही, ड्रग्जच्या रॅकेटमध्ये ललित पाटील हा एकटाचं सहभागी नाही तर सरकार तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लोटण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय. तर ड्रग्ज माफियांना सरकारचा छुपा पाठिंबा आहे असा आरोप विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. केवळ दिखाव्यासाठी थातुरमातुर कारवाई केली जात आहे. नाशिकचा कारखाना कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, या मागे गुजरातचं कनेक्शन आहे, असा आरोप विजयी वडेट्टीवार यांनी केलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details