महाराष्ट्र

maharashtra

राहुल गांधी आणि विजय वडेट्टीवार

ETV Bharat / videos

Vijay Wadettiwar News : मोदी सरकारला राहुल गांधी यांच्या रुपात धनाजी संताजी दिसू लागले - विजय वडेट्टीवार - विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

By

Published : Aug 7, 2023, 5:19 PM IST

पुणे :काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी देण्यात आली आहे. मोदी आडनावावरून न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यावर आज लोकसभेत राहुल गांधी यांच्या खासदारकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावर राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही अशीच आज परिस्थिती दिसत आहे. आत्ता हुकूमशाही आणि संविधान विरोधी काम करणाऱ्या सरकारला राहुल गांधी यांच्या प्रहारातून मुक्ती मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार राहुल गांधी यांना एवढे घाबरले आहे की, त्यांना राहुल गांधी यांच्या रुपात धनाजी संताजी दिसू लागले आहेत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. पण कोर्टाने स्थगिती दिली आणि राहुल गांधी यांना परत खासदारकी मिळाली आहे. आज जेवढा आनंद आम्हाला झाला आहे, त्यापेक्षा जास्त आनंद जे संविधान मनातात त्यांना झाला आहे, असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले. पुण्यात आज ओबीसी समजाची ओबीसी ऐक्य महापरिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वडेट्टीवार उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details