महाराष्ट्र

maharashtra

विजय वडेट्टीवार

ETV Bharat / videos

Vijay Wadettiwar On BJP: भाजपाने पराभवाची धास्ती घेतली- विजय वडेट्टीवार - Vijay Wadettiwar Criticism BJP

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:34 PM IST

मुंबईVijay Wadettiwar On BJP:देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. (Vijay Wadettiwar Criticism BJP) त्यामुळे निवडणुकीच्या पूर्व तयारीला देशातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सर्वच पक्ष सोशल मीडियाचा वापर सर्रास करत आहेत. भाजपाने आपल्या सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते, खासदार यांना रावणाच्या भूमिकेत (Rahul Gandhi as Ravan) दाखवल्याने राज्यातील काँग्रेस पक्षाकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Lok Sabha Election 2024) असा प्रकार म्हणजे भाजपाने पराभवाची धास्ती घेतल्याचे सिद्ध होत असल्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (BJP Social Media)
 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना रावणाच्या भूमिकेत दाखवून भाजपाने स्वतःच्या पराभवाची धास्ती घेतल्याचे सिद्ध होत असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी कोणते कृत्य केले की,  त्यांना रावणाच्या भूमिकेत दाखवलं. ज्या देशात तीन तीन गांधींनी या मातीत स्वतःचे रक्त सांडून देश उभा केला तर दुसरीकडे भाजपाची सत्ता आल्यानंतर महिलांचे शोषण करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. महिला कुस्तीपटूंचे शोषण करणाऱ्या खासदाराला पाठीशी घातलं जातं. मणिपूर मधील दलित महिलांची धिंड काढून अत्याचार केला जातो आणि सरकार चूप बसते हे रावणराज्य आहे की नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details