Viral : लिंबू दहा रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याने मांडल्या व्यथा - बार्शी
सोलापूर - जिल्ह्यातील वैरागच्या (ता. बार्शी) बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यामांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो लिंबू विकताना शेतकऱ्यांची व्यथा मांडत आहे. 'लिंबू घ्या दहा रुपयाला दोन, घेतयं का कोण, की लावू शरद पवारांना फोन..?', असे म्हणत ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. इतकेच नाही तर 'दहा एकर बागायत हाय, पण शेतकऱ्याच्या पोराला पोरगी कोणी देईना', असे सांगत त्याने तमाम शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.शेतकऱ्याच्या पोराला पोरगी कोणी देईना', असे सांगत त्याने तमाम शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST