महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video of stuntman: बाईकवर थरारक स्टंट करणाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिस करणार कारवाई - दुचाकीवर स्टंट

By

Published : Aug 8, 2022, 5:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

रुरकी (उत्तराखंड) : सालियर गावात एक व्यक्ती दुचाकीवर स्टंट करताना दिसली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेहराडून-रुरकी हायवेवर बाईकवर स्टंट करणारी व्यक्ती गंगनाहर कोतवाली परिसरातील तेलीवाला गावातील रहिवासी आहे. त्याचे नाव इक्बाल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. इक्बाल सालियर गावात मोटरसायकलवर स्टंट करताना दिसत आहे. मोटारसायकलस्वार स्टंटमॅन इक्बाल सांगतो की, त्यानेही मृत्यूच्या विहिरीत मोटारसायकल चालवली आहे. स्टंटमॅन इक्बालने लोकांना सल्ला दिला आहे की, त्याला पाहून कोणीही बाइकवर स्टंट करू नये. कारण ही त्याची लहानपणापासूनची सरावातून तयार झालेली गोष्ट आहे. त्याला लहानपणापासूनच बाइक चालवण्याची आवड होती. या प्रकरणी रुरकीचे सीओ विवेक कुमार म्हणतात की ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. दुचाकीवर स्टंट करणाऱ्या तरुणाची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या किंवा असे स्टंट करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. हेही पाहा- Building Collapses In Dakshina : पत्त्याच्या पानांसारखी कोसळली इमारत; पाहा व्हिडिओ
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details