महाराष्ट्र

maharashtra

Viral Video

ETV Bharat / videos

Farmers DJ Dance : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट; मालाला भाव मिळाल्याने शेतकरी डीजेच्या तालावर झिंगाट, पाहा व्हिडिओ - video of farmers dancing

By

Published : May 7, 2023, 8:33 PM IST

छत्रपती संभाजीनगर :  आपल्याला आनंद झाल्यावर नृत्य करणे हे नेहमीचच, मात्र आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकांना चांगला भाव मिळाल्यावर त्याने डीजे लावून डान्स केला? असे कोणी म्हणलं तर विश्वास बसणार नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो. यामध्ये शेतकरी आपल्या शेत मालाला चांगला भाव मिळाल्याने चक्क डीजे लावून डान्स करत आहे. हा व्हिडिओ गंगापूर तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्याच्या आद्रकीला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकरी झिंगाट झाल्याचे पहायला मिळत आहे. शेतकऱ्यानी आद्रक धुतांना चक्क डीजेवर ताल धरल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, हे शेतकरी कोण आहे किंवा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष केंद्रित करत आहे हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details