Heavy Rains Lash In Vasai Virar : वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे हाल - वाहनधारकांना मोठा मनस्ताप
पालघर :वसई विरारमध्ये मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सखल भाग पाण्याखाली गेला आहे. या पावसाचा फटका शहरातील रस्ते वाहतुकीला बसला आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज रोडवर दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे. या पाण्यात अनेक वाहने बंद पडत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय शाळकरी मुले, पादचाऱ्यांना याच पाण्यातून आपल्या वाट काढावी लागत आहे. शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती असल्याने पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तर कामासाठी निघालेले चाकरमानी पावसामुळे अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.