महाराष्ट्र

maharashtra

वसईत आठ वर्षीय बालिकेची हत्या

ETV Bharat / videos

बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय बालिकेचा आढळला मृतदेह, आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना - वसई हत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 8:22 AM IST

वसई Mumbai Vasai Crime :वसईत 1 डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह सोमवारी (4 डिसेंबर) एका बंद खोलीत आढळून आला. ही मुलगी वसई पूर्वेच्या वसई फाटा परिसरात आई वडील अन् भावंडासह राहत होती. ती जवळच्या जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीत  शिकत होती. शनिवारी (1 डिसेंबर) ती शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून आईस्कीम घेण्यासाठी गेली. त्यानंतर घराजवळ खेळत असताना अचानक ती बेपत्ता झाली. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या चिमुकलीचा मृतदेह ती राहत असलेल्या घराच्या शेजारी असलेल्या बंद खोलीत आढळून आला. पेल्हार पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविला.  मुलीचा मृत्यू नेमका कशानं झाला, तिच्यावर अत्याचार झाला का? हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत.  लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल, असं पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details