Vaibhav Naik on Narayan Rane : उद्धव ठाकरे यांनाच नाही तर शिवसेनेच्या कोणत्याही लोक प्रतिनिधीला अडवून दाखवा - वैभव नाईक - रत्नागिरी बारसू रिफायनरी
सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी बारसू रिफायनरी या ठिकाणी येऊन दाखवावे, असे आव्हान दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडा तर शिवसेनेच्या कोणत्याही लोक प्रतिनिधीला अडवून दाखवा, असे प्रति आव्हान आमदार वैभव नाईक नारायण राणे यांना दिले आहे. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची तारीख लवकरच सांगतील. ज्या भूमी पुत्रांचे प्रकल्पाला विरोध आहे, त्याचs आधी निरसन करा. त्यानंतरच तो प्रकल्प त्या ठिकाणी आणा. या आधी अनेक प्रकल्प कोकणात झालेले आहे. कोकण रेल्वेलाही लोकांनी अडवले नाही. मुंबई गोवा महामार्गाच्या वेळी राणे सत्तेत नव्हते. त्यावेळी सुद्धा कोणी अडवले नाही. नारायण राणेंच्या अरेरावीला नाणारमधून लोकांनी कस हाकलून लावले, त्याचे व्हिडिओ क्लिप अजूनही आहेत. कोकण हे उद्धव ठाकरे याचे आहे तर उद्धव ठाकरे यांचे मोठ्या दिमाखात स्वागत कोकणात केले जाणार आहे. उद्धव ठाकरे बारसूत येण्याआधी राणे यांनी आम्हाला वेळ सांगा. त्या ठिकाणी आम्ही येऊ. आधी आम्हाला अडवा मग उध्दव ठाकरेंना अडविण्याची भाषा करा. बारसूतील लोक हे सर्वसामान्य आहेत. लोकांवर अन्याय होत आहे. लाठीचार्ज होतो म्हणून त्या ठिकाणी आम्ही आवाज उठविणार अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली आहे.